घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ; आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

0
37
death
death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरील व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते. या घटनेने घाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती व जखमेला मुंग्या लागल्याचेही निदर्शनास आले. ही व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी अपघात विभागातील डॉक्टरांना याबाबत माहिती दिली. मात्र कोणीही दखल घेतली नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्या व्यक्तीने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीला अपघात विभागात दाखल करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने धावपळ केली. मात्र काही उपयोग झाला नाही. घाटीतील अपघात विभागासमोर पडून असलेल्या या व्यक्तीविषयी घाटी रुग्णालयात समाजसेवा करणाऱ्यांनी डॉक्टरांना माहिती दिली. या व्यक्तीला कोणीतरी घाटी रूग्णालयाच्या परिसरात कोणीतरी सोडून गेल्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे म्हणाले.

या व्यक्तीला ज्यांनीही घाटीत सोडले, त्यांनी अपघात विभागात दाखल करणे गरजेचे होते. या व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी अपघात विभागात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याची ओळखही पटलेली नाही. एका कोरोना रुग्णाला दाखल करताना अपघात विभागासमोर सदर व्यक्ती पडून असल्याचे दिसले. त्याच्या पायाला झालेल्या जखमेला मुंग्या झाल्या होत्या. तोपर्यंत तो जिवंत होता. त्याविषयी अपघात विभागातील डॉक्टरांना माहिती दिली. तसेच आरएमओंनाही माहिती दिली. पण दोन तासांनंतरही कोणीही आले नाही. शेवटी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वेळीच त्याच्यावर उपचार केले असते तर प्राण वाचले असते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here