Monday, January 30, 2023

रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. फोनवरून ही धमकी देण्यात आली असून या प्रकरणी रवी राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यातमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रवी राणा यांच्या मोबाईलवर एका क्रमांकावरून फोन येत आहेत. यामध्ये उद्धव ठाकरेंबद्दल एकही शब्द उच्चारल्यास पिस्तूल आणि चाकूने ठार मारू अशी धमकी सदर आरोपीने राणा याना दिली. सध्या रवी राणा हे नागपूर येथे अधिवेशनासाठी उपस्थित आहेत. त्यापूर्वीच त्यांना या धमक्या आल्या आहेत.

- Advertisement -

धमकी देणाऱ्या व्यक्तीची सखोल चौकशी करून त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी विनोद गुहे यांनी केली आहे. सदर धमकी देणारी व्यक्ती उद्धव ठाकरे यांचा समर्थक असल्याचं सांगत आहे. उद्धव ठाकरेंविरोधात काही बोलल्यास ठार मारण्यात येईल, असे आरोपीने म्हंटल्याचे गुहे यांनी सांगितलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.