छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला पोलिसांच्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा कॉल आला आहे. आपल्याला भुजबळ याना मारण्याची सुपारी देण्यात आली आहे असे सदर आरोपी फोनवर बोलत होता. यानंतर पोलिसांनी तात्काळ धमकी देणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

छगन भुजबळ काल पुण्यात असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला. आपलं नाव प्रशांत पाटील असून आपल्याला छगन भुजबळ याना जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली असल्याचे सदर आरोपीने सांगितलं. त्यांना मी उद्याच मारणार आहे, असेही आरोपी म्हणाला. धमकीच्या या कॉल नंतर भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू करत मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून ताब्यात केली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याने मद्यधुंद अवस्थेत छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र तरीही या धमकीनंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ सध्या पुण्यातील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहेत. तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.