20 कोटी द्या नाही तर…, मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीदाराने अंबानी यांच्याकडे तब्बल 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे. जर अंबानींनी हे पैसे दिले नाही तर त्यांना जीवे मारण्यात येईल, असा इशारा धमकीदाराकडून देण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांनाही धमकी ईमेल आयडीवर पाठविण्यात आली आहे. सध्या ही धमकी कोणी पाठवली याचा तपास पोलीस घेत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेलवर एक मेसेज पाठविला होता. या मेसेजमध्ये असे लिहिण्यात आले होते की, “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत” ही धमकी मिळाल्यानंतर ताबडतोब मुकेश अंबानी यांनी गावदेवी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलीस धमकीदाराचा शोध घेत आहेत.

दरम्यान, मुकेश अंबानी यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तर यापूर्वी देखील अंबानी कुटुंबाला अनेक धमक्या देण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या धमकी मागे अनेक वेगवेगळी कारणे होती. यापूर्वी, एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची मुकेश अंबानी यांना दिली होती. तसेच, एका अज्ञात व्यक्तीकडून देखील मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. ज्याचा तपास पोलीस घेत आहेत.