विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीला विरोध केल्यामुळे एका अज्ञात व्यक्तीने वडेट्टीवार यांना मोबाईल नंबरवर मेसेज पाठवत ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर वडेट्टीवार यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आपली सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, मिळालेल्या धमकीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांना ही धमकी नागपूरमध्ये असताना देण्यात आली आहे.

मध्यंतरी वडेट्टीवार यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जरांगे-पाटील यांच्या मागणीला विरोध दर्शवला होता. तसेच, जरांगे-पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली होती. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतरच वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याची माहिती वडेट्टीवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्याचबरोबर, त्यांनी आपल्याला देण्यात आलेल्या सरकारी सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणा देण्याबाबत छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर त्यांना देखील अज्ञात व्यक्तींकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांना धमकीचा फोन आणि मेसेज आला आहे. ज्यामुळे मंत्र्यांना या धमक्या नेमकं कोण देत आहे? याबाबत पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.