हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाताळ सण हा ख्रिसमस ट्री शिवाय अपूर्ण असतो. त्यामुळे ख्रिसमस ट्री हा सर्वात सुंदर दिसावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते. परंतु या ख्रिसमस ट्री ला सुंदर कसे बनवावे हे अनेकांना लवकर सुचत नाही. त्यामुळे आज आपण ख्रिसमस ट्री सुंदर पद्धतीने कसा सजवायचा याच विषयी जाणून घेणार आहोत. या स्टेप्स फॉलो करत तुम्ही जर ख्रिसमस ट्री सजवला तर तुमच्या घराची शोभा वाढेल.
लाइटिंग स्टार्स
सध्या बाजारामध्ये ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी मिळत आहेत. यामध्ये तुम्ही जर लाइटिंग स्टार्स खरेदी केले आणि त्याला जर तुमच्या ख्रिसमस ट्री ला लावले तर ट्री खूपच खुलून आणि सुंदर दिसेल. या स्टार्सला तुम्ही ख्रिसमस ट्री च्या आतमध्ये देखील लावू शकता. त्याचबरोबर घरात देखील आपण त्या वापरू शकतो.
टॉय कार
ख्रिसमस ट्री मुलांचे सर्वात आवडीचे असते. त्यामुळे ट्री ला आपण टॉय कार जोडू शकतो. सध्या बाजारात टॉय कारचा संपूर्ण सेट फक्त शंभर रुपयाला मिळत आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगीबेरंगी टॉय कार मिळून जातील. या कार तुम्ही ट्रीच्या बाजूला ठेवल्या किंवा ट्रीवर जरी लावल्या तरी ख्रिसमस ट्री खूपच आकर्षित दिसेल.
फोटो
ख्रिसमस ट्री सजवायचा असेल तर त्यासाठी सर्वात सुंदर आयडिया म्हणजे तुम्ही तुमचे गेल्या वर्षीचे ख्रिसमस डेचे फोटो ट्री ला जोडू शकता. तसेच तुमच्या ज्या जुन्या आठवणी असतील त्या देखील तुम्ही ट्री सोबत जोडू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी देखील पुन्हा आठवतील आणि ख्रिसमस ट्री ही सुंदर दिसेल.
फुगे
कोणत्याही गोष्टीचे सेलिब्रेशन करायचे असेल तर आपण फुग्यांचा वापर नक्की करतो. यात ख्रिसमस ट्री सजवायचे असेल तर तुम्ही फुगे नक्की वापरू शकता. वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या आकाराचे फुगे सेलिब्रेशन ट्री ची शोभा वाढवे.
थीम ठरवा
यंदाच्या नाताळामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी एक वेगळी थीम देखील ठरवू शकता. या तुम्ही सेलिब्रेशन ट्री चा वापर वेगवेगळ्या थीम्स बनवण्यासाठी करू शकता. स्नो ट्री, चॉकलेट ट्री, फोटो ट्री अशा वेगवेगळ्या थीम्स तुम्ही वापरू शकता.