Wednesday, February 8, 2023

दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार?? सूचक विधानाने चर्चाना उधाण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यांनतर अनेक स्थानिक पदाधिकारी, नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गट प्रवेश केला आहे. त्यातच आता शिवसेनेच्या आक्रमक नेत्या दीपाली सय्यद या सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार का अश्या शक्यतांना बळ मिळत आहे. खुद्द दीपाली सय्यद यांनीच वेट अँड वॉच असं म्हणत याबाबत सूचक संकेत दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, प्रत्येकजण आपापली मतं मांडत आहेत. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह आहात का? असा सवाल केला असता असता मी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यांनतर दीपाली सय्यद यांनी ठाकरे शिंदेंना एकत्र येण्यासाठी प्रयत्नही केले होते. मात्र आता सुषमा अंधारे यांचा प्रवेश झाल्यापासून दीपाली सय्यद फारशा सक्रीय झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे आता सुद्धा त्या उद्धव ठाकरेंसोबत राहणार कीं शिंदे गटात जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.