‘बेशरम’ दीपिकाचं आलं ओरिजनल वर्जन; अस्सल गावरान मुलांचा फनी व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड किंगखान अशी ओळख असलेला शाहरूख खान आणि हॉट अभिनेत्री दीपिका त्यांच्या येत्या ‘पठाण’ या सिनेमामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हे दोघे त्यांच्या बेशरम गाण्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. तर काही जण बॉयकॉटची मागणी करत आहेत. शाहरुख व दिपकच्या या गाण्याचे अनेकांनाही भुरळ घातली आहे तर काहीजणांकडून य गाण्यावरून रिल्स, फनी व्हिडीओ बनवले जाऊ लागले आहरेत. सध्या ‘बेशरम’मधील दीपिकाच्या गाण्याचं ओरीजनल व्हर्जन आलं आहे. आता ग्रामीण भागातील मुलांकडूनही या गाण्या संबंधितच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो फार फनी असून त्यावर आता नेटकर्याकडून भन्नाट कमेंट्स करण्यात आलेल्या आहेत. या व्हिडीओमध्ये नदीकाठी बसलेली काही मुले बसली असून ती ‘बेशरम रंग’ या गाण्यावर फनी डान्स करत असताना दिसत आहेत. दीपिकाच्या सिझलींग डान्स मूव्ह्जना रिक्रीएट करत या पोरांनी दीपिकाच्या डान्सचा फनी व्हिडीओ बनवला आहे.

‘बेशरम रंगचं ओरिजनल वर्जन’ असे म्हणत नेटकऱ्यांनी एका पेक्षा एक कमेंट करत या गाण्याची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ भन्नाट व्हायरल होत असून व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत कुणी ‘द संस्करी बेशरम रंग’ तर कुणी ‘बेशरम रंगचं ओरिजनल व्हर्जन’ असे भन्नाट कमेंट केले आहेत.

बेशरम मधील या गाण्यावेळी दीपिकाने वापरलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटावर बॉयकॉट करायला पाहिजे, अशी मागणी नेटकऱ्याकडून केली जात आहे.