2025 ची बकेट लिस्ट बनवताय? तर या 5 ठिकाणांना अजिबात स्किप करू नका

tourism news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नविन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येकजण आपली बकेट लिस्ट तयार करतो. परंतु अनेकवेळा या लिस्टमध्ये फिरण्याची कोणकोणती ठिकाणे टाकावीत यात गोंधळ उडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशी काही सुंदर ठिकाणी सुचवणार आहोत, जिथे तुम्ही 2025 मध्ये भेट देऊ शकता.

लडाख

सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये लडाखची रोड ट्रिप लिहा. उंच पर्वतरांगा, निळसर तलाव, आणि बौद्ध परंपरा जाणून घेण्यासाठी तुम्ही लडाखची ट्रीप अवश्य करा. येथे जाऊन तुम्ही पँगाँग सरोवर आणि खारदुंगला पाससारख्या ठिकाणाला भेट देऊ शकता.

वायनाड

केरळमधील वायनाड हे निसर्गप्रेमींसाठी सर्वात आकर्षक ठिकाण आहे. हिरवाईने नटलेली टेकड्या, तलाव, शिखर, हार्ट शेप तलाव, आणि वन्यजीव अभयारण्य ही ठिकाणे वायनाड मध्ये पाहण्यासारखी आहेत. जिथे जायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

मेघालय

फिरण्यासाठी मेघालय देखील सर्वात सुंदर ठिकाण आहे. येथील लिविंग रूट्स ब्रिज आणि मावलीनोंगचे स्वच्छ वातावरण पर्यटकांचे मन मोहून टाकते. मेघालयात इतरही अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. जिथे गेल्यानंतर तुम्हाला नयनरम्य दृश्य पाहायला मिळतील.

जैसलमेर

राजस्थानमधील जैसलमेर हे पर्यटकांसाठी सर्वात आकर्षित असे ठिकाण आहे. जैसलमेर येथील किल्ले, हवेल्या, आणि सॅम सॅंड ड्युन्सचे वाळवंटी सौंदर्य पाहण्यासारखे आहे. खास म्हणजे, येथील उंट सफारी एक वेगळाच अनुभव देते.

अंदमान

समुद्रप्रेमींसाठी अंदमान-निकोबार सर्वात सुंदर फिरण्याचे ठिकाण आहे. स्कूबा डायव्हिंग, स्वच्छ किनारे दूरवर दिसणारा समुद्र पर्यटकांना एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. त्यामुळे 2025 मध्ये तुम्ही या ठिकाणी फिरायला जाण्याचा नक्कीच प्लॅन करू शकता.