Delhi Blast : राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? समोर आली खळबळजनक माहिती

Delhi Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली स्फोट (Delhi Blast) प्रकरणी नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. कार मध्ये जरी हा भीषण स्फोट घडवण्यात आला असला तरी सत्य मात्र वेगळंच नाही. दिल्ली लाल किल्ला हे त्यांचे टार्गेट नसून त्यांचा प्लॅन यापेक्षाही कितीतरी पट खतरनाक असल्याचे आरोपींच्या चाैकशीतून पुढे येतंय. दहशतवाद्यांना दिल्लीत स्फोट करायचाच नव्हता, तर त्यांच्या निशाण्यावर राम मंदिर (Ram Mandir) होते. सूत्रांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फरिदाबाद मॉड्यूलने उत्तर प्रदेशातील प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळे, विशेषतः अयोध्या आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लक्ष्य केले होते.

तुर्की कनेक्शन उघड- Delhi Blast

विविध ठिकाणांहून अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी अयोध्येमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठीचा कट रचला होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फरिदाबाद मॉड्यूलने उत्तर प्रदेशातील प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळे, विशेषतः अयोध्या आणि वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लक्ष्य केले होते. त्यासाठी सध्या अटकेत असणाऱ्या शाहीननं अयोध्येत एक स्लीपर सेलसुद्धा सक्रिय ठेवली होती. मात्र, दहशतवादी त्यांचा हा डाव साधतील त्याआधीच स्फोटकांसह त्यांच्या या कटाची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी ती जप्त केली. तपास यंत्रणांनी डॉ. उमर आणि डॉ. मुझम्मिल यांचे पासपोर्ट तपासले, ज्यामध्ये तुर्की कनेक्शन उघड झाले. टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर, हे संशयित तुर्कीला गेले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी २६/११ च्या हल्ल्यासारखाच हल्ला करू इच्छित होते.

अजूनही ३०० किलो स्फोटके-

तपासातून असे दिसून येते की, स्फोटकांमध्ये (Delhi Blast) कोणताही टायमर नव्हता. अतिघाई, घाबरलेपणा आणि गोंधळातून हा स्फोट करण्यात आला. दहशतवाद्यांनी चाैकशीत सांगितले की, त्यांना स्फोट जास्तीत जास्त लोक असलेल्या ठिकाणी उडवायचा होता. भारतासाठी धोक्याची बाब म्हणजे अजूनही ३०० किलो स्फोटके दहशतवाद्यांनी कुठे तरी लपवून ठेवली आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा एजन्सींसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे की, उर्वरित 300 किलो अमोनियम नायट्रेट त्यांना जप्त करायचा आहे. त्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरु आहे.