हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Delhi Blast Video । दिल्ली बॉम्बस्फोटाचा विडिओ अखेर समोर आला आहे. लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या या भीषण बॉम्बस्फोटात ९ नागरिकांना प्राण गमवावा लागला तर तब्बल 15 जण जखमी झाले होते. धावत्या कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला. या संपूर्ण घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात असतानाच आता या स्फोटाचा भयानक आणि धक्कादायक विडिओ समोर आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या रात्री नेमकं काय घडलं याचा उलगडा झाला आहे. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
काय आहे विडिओ मध्ये – Delhi Blast Video
तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कि, रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसत आहे. सर्व गाड्या एका सिग्नल वर थांबल्या होत्या, त्याच दरम्यान हा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता. आणि आगीचा मोठा गोळा तयार झाला. आजूबाजूला असलेल्या कार आणि रिक्षा तसेच इतर गाड्या अक्षरशः जळून खाक झाल्या. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काहीजणांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. त्यांच्या शरीराचे तुकडे काही अंतरावर जाऊन पडले होते. ज्या संगणकाच्या स्क्रीनवर व्हिडिओ प्ले (Delhi Blast Video) होत होता त्या संगणकाच्या स्क्रीनवर एक अंधुक फ्लॅश पसरला.
#WATCH | Delhi | CCTV footage of the car blast near the Red Fort that claimed the lives of 8 people and injured many others.
— ANI (@ANI) November 12, 2025
Source: Delhi Police Sources pic.twitter.com/QeX0XK411G
दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्ला
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) सांगितले की, सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेला स्फोट ‘स्पष्टपणे’ ‘दहशतवादी हल्ला’ होता. त्यांनी तपास हाताळण्यात देशाच्या व्यावसायिकतेचे कौतुक केले. स्पष्टपणे दिसत आहे कि हा दहशतवादी हल्ला होता. अत्यंत स्फोटक पदार्थांनी भरलेल्या कारच्या माध्यमातून हा स्फोट घडवण्यात आला आणि बरेच लोक मारले.
दहशतवादी डॉ.उमरचा मृत्यू
दरम्यान, या स्फोटामध्ये दहशतवादी उमर याचा मृत्यू झाला आहे. या आत्मघातकी स्फोटात त्याने कारमध्ये बसू स्वत:लाही उडवलं. डीएनए सँपलवरून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली स्फोटाचे तुर्की कनेक्शन सुद्धा समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च 2022 मध्ये काही व्यक्ती भारतातून तुर्कीला गेले होते. त्या काळात त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले असावे असा संशय व्यक्त होत आहे. डॉक्टर उमर, आदिल आणि मुझम्मिल हे दहशतवादी तुर्कीला गेले आणि तेथे त्यांच्या हँडलर्सना भेटले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.




