Tuesday, June 6, 2023

Delhi Capitals Vs Mumbai Indians मध्ये उद्या अंतिम सामना; कुठे आणि कसा पाहणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच सुरु झालेल्या महिला आयपीएलचा थरार उद्या संपणार आहे. उद्या मुंबई येथील ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कपिटल्स मध्ये अंतिम सामना होणार आहे . आत्तापर्यंतचे महिला आयपीएलचे सामने पाहिले तर उद्याचा अंतिम सामनाही रोमांचक होईल याबाबत शंका नाही. त्यामुळे हा सामना कुठे होणार आहे आणि टीव्ही वर कुठे पहायचा याबाबत जाणून घेऊया…

खरं तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे 2 संघ यंदाच्या महिला आयपीएल मधील यशस्वी संघ म्हणता येतील. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघाकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे दोन्ही संघानी साखळी फेरीतील 8 पैकी 6-6 सामने जिंकले होते. मात्र दिल्लीचा नेट रनरेट चांगला असल्याने त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

कधी आहे सामना – रविवार 26 मार्च, संध्याकाळी 7.30 वाजता
कुठे आहे सामना – ब्रेबॉन स्टेडियम, मुंबई
सामन्याचे लाइव टेलीकास्ट – स्पोर्ट्स 18 चॅनल
मोबाईलवर लाइव स्ट्रीमिंग- जिओ सिनेमा अॅप

दोन्ही संघातील खेळाडूंची नाव –

मुंबई इंडियन्स – हरमनप्रीत कौर, यास्तिका भाटिया, अमनजोत कौर, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, नटालिया सिव्हर, धारा गुजर, सायका इशाक, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिश्त, सी वांग, हीदर ग्रॅहम, जिंतीमणी कलिताकर,

दिल्ली कॅपिटल्स- मेग लॅनिंग (क), जेमिमाह रॉड्रिग्स, लॉरा हॅरिस, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मारिजन कॅप, टायटस साधू, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तान्या भाटिया, पूनम यादव , जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मंडल