Wednesday, October 5, 2022

Buy now

… तर मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही; केजरीवालांचा खळबळजनक आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम सल्लागार हिरेन जोशी हे देशभरातील मीडिया चॅनेल्सच्या मालकांना आणि संपादकांना धमकवतात असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर याचे स्क्रिनशॉट शेअर केले तर मोदींना तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

दिल्लीतील आम आदमी पार्टीने 18 सप्टेंबर रोजी देशभरातील ‘आप’च्या लोकप्रतिनिधींचे अधिवेशन आयोजित केले होते. या परिषदेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. हिरेन जोशी हे पीएम मोदींच्या कार्यालयात मीडिया सल्लागार म्हणून काम करतात. मला अनेक मोठ्या वाहिन्यांचे मालक आणि संपादक सांगायचे की ते कसे कसे मेसेज त्यांना करतात . मीडियावर केजरीवालांना दाखवाल तर आम्ही हे करू, आम्ही ते करू … ‘आप’ दाखवायची गरज नाही, काय धमक्या देत आहेत, अशा धमक्या देऊन देश चालवाल काय?? असा सावळ त्यांनी भाजपला केला.

केजरीवाल पुढे म्हणाले की, मला हिरेन जोशीना एकच सांगायचे आहे की, तुम्ही केलेला मेसेज आणि धमकीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकला तर तुम्हाला आणि पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमच्या धमक्या रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत, सोशल मीडियावर या धमक्या टाकल्या तर तुम्ही तोंड दाखवू शकणार नाही त्यामुळे धमक्या देणं बंद करा.