ठाकरे गटाला मोठा धक्का : दिल्ली हायकोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून ठाकरे गटाला एक ना एक धक्के बसत आहेत. दरम्यान आज पुन्हा एक धक्का ठाकरे गटाला बसला आहे. दिल्ली हायकोर्टात निवडणूक आयोगाच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.

शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठवण्याबाबत दाखल केलेल्या ठाकरे गटाने याचिकेवर
आज सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असे दिल्ली हायकोर्टाने आपल्या निर्णयात म्हंटले. तसेच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी शिवसेना या पक्षनावावर व धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. ८ ऑक्टोबर रोजी दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला. या हंगामी निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला.

आज सुनावणी दरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाची याचिकाच कोर्टाने फेटाळून लावली. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवणं किंवा इतर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असं म्हणत दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे.