दिल्ली- मुंबई Expressway चे सुंदर फोटो; 6 राज्यांना जोडतोय महामार्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या वडोदरा-विरार विभागाचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत. गडकरींनी हे फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. 2024 च्या अखेरीस भारतीय रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले बनवण्याच्या गडकरींच्या योजनेअंतर्गत हा एक्सप्रेसवे येतो.

Delhi Mumbai Expressway

1,382 किमी लांबीचा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग आहे. हा महामार्ग हरियाणातील ३ जिल्हे, राजस्थानातील ७ जिल्हे, मध्य प्रदेशातील ३ जिल्हे आणि गुजरातमधील ३ जिल्ह्यातून जात आहे.

Delhi Mumbai Expressway

9 मार्च 2019 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 8-लेन दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेची पायाभरणी करण्यात आली.

Delhi Mumbai Expressway

हा द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी सुरु झाल्यानंतर दिल्ली- मुंबई द्रुतगती मार्गावरून जयपूर, अजमेर, कोटा, उदयपूर, इंदूर, अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा या महत्त्वाच्या शहरांदरम्यानची वाहतूक सोप्पी होणार आहे. हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी आणि राष्ट्रीय राजधानीमधील अंतर 12 तासांत कापले जाणार आहे.

Delhi Mumbai Expressway

दिल्ली मुंबई दरम्यान बांधल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वेसाठी सुमारे 98,233 कोटी रुपये खर्च येणार आहे. दिल्ली -मुंबई एक्सप्रेस वे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणूनही ओळखला जाईल.

Delhi Mumbai Expressway

हा एक्स्प्रेस वे जर्मन तंत्रज्ञानाने बांधला जात आहे. सुरक्षेसाठी या एक्स्प्रेस वेवर प्रत्येकी ५०० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या द्रुतगती मार्गावर कुठेही स्पीड ब्रेकर असणार नाही, तसेच प्रवासादरम्यान कोणताही प्राणी रस्त्यावर आडवा येऊ नये यासाठी सुद्धा खास व्यवस्था करण्यात आली आहे.

Delhi Mumbai Expressway

या एक्स्प्रेस वेवर टोल वसूल करण्यासाठी एक खास पद्धतही अवलंबण्यात आली आहे, या एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना तुमची गाडी जेवढा प्रवास करेल तेव्हडाच टोल तुम्हाला भरावा लागेल. मिनीबससाठी 1.05 रुपये प्रतीकिमी, बस आणि ट्रकसाठी 2.20 रुपये प्रतीकिमी, जेसीबीसारख्या अवजड यंत्रांसाठी 3.45 रुपये प्रतीकिमी आणि इतर अवजड वाहनांसाठी 4.20 रुपये प्रति किलोमीटर टोल टॅक्स असेल.