दिल्लीत हादरवणारी घटना; एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रद्धा हत्याकांड प्रकरणामुळे सर्वत्र गलबल उडाली असून अशात दिल्ली पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाच्या घटनेने हादरली आहे. दिल्लीच्या दक्षिण भागातील पालम मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली. घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला आहे. एका घरात चार मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, दिल्लीतील राज नगर पार्ट २ मध्ये घरात राहणाऱ्या मुलाने चाकूच्या साहयाने भोसकून वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनी सर्व मृतदेह आता ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी असलेल्या मुलाला ताब्यातही घेतले असून सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करणारा मुलगा हा व्यसनाच्या आहारी गेलेला होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. तो नुकताच व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन घरी परतला होता. पण घरी कुणाशीच त्याचे पटत नव्हते. घरात झालेल्या वादातूनच त्याने हे धक्कादायक कृत्य केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे.