जेएनयू हल्ल्यात जखमी विद्यार्थी संघ अध्यक्षावरच दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। जेएनयू हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपली कारवाई सुरु सुरु करत ४ जानेवारी रोजी जेएनयूच्या सर्वर रुममध्ये तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांच्या वाहनांवर हल्ला केल्याच्या तसेच सुरक्षा रक्षकांना मारहाण केल्याच्या आरोपांखाली आयेषी घोष हिच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेएनयू प्रशासनाने याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती.

दरम्यान रविवारी रात्री बुरखाधारी लोकांनी धुडघूस घालत विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये १८ विद्यार्थी आणि काही प्राध्यापक जखमी झाले होते. सुमारे ५ तास हा गोंधळ सुरु होता. या हल्ल्यात जेएनयूच्या विद्यार्थी संघाची अध्यक्ष आयेषी घोष हीच्या डोक्यात मारहाण झाल्याने ती गंभीर जखमी झाली होती.हा हल्ला एबीव्हीपीच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी घडवून आणल्याचा आरोप जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला होता. तर एबीव्हीपीने याचा इन्कार करीत डाव्या विद्यार्थी संघटनांवर उलटा आरोप केला होता.

एकीकडे जेएनयूवर हल्ला करणारे हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या हाती लागले नसताना उलट या हल्ल्यात पीडित विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याने दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे. मात्र हे गुन्हे जेएनयू प्रशासनाच्या तक्रारीवरूनच दाखल केल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.