राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ? दिल्ली पोलीसांची फौज घरी दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी एक विधान केले होते. या विधानावरून आता त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केल्याप्रकरणी गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्या नोटिसीला गांधी यांनी प्रत्युत्तर दिले नसल्याने स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा हे दिल्ली पोलीसांसह त्यांच्या घरी दाखल झाले आहेत.

यावेळी सागर प्रीत हुड्डा यांनी माध्यमांशी संवाद साधला असून ते म्हणाले की, आम्ही राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो असून राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये जे विधान केले होते त्या विधानाबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती. ही यात्रा श्रीनगरला पोहोचली होती. तेव्हा राहुल गांधी यांनी येथील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महिलांचं लैंगिक शोषण होत आहे. आमच्याकडे तशा तक्रारी आल्या आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.