Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचा त्या 4 डॉक्टरांशी संबंध? AK-47 रायफल, स्फोटकं सगळंच सापडलं

Delhi Red Fort Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Bomb Blast Photos) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. त्यावरुन हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यादरम्यान हरियाणा येथील एकाच हॉस्पिटल मधील ४ डॉक्टर चर्चेत आले आहेत.

स्फोटाच्या दिवशीच म्हणजेच सोमवारी सकाळी, जम्मू आणि काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या घरांमधून २,९०० किलो आयईडी बनवणारे रसायने, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. परंतु धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्याचे थेट कनेक्शन हे डॉक्टरांशी जोडलं जातंय. या स्फोटाशी संबंधित कोणताही धागा व्यवसायाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीपर्यंत घेऊन जातोय.

डॉ. आदिल अहमद राठर

दिल्लीत स्फोट (Delhi Red Fort Blast) होण्याआधी अनंतनागमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आहे. त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना AK-47 रायफल सापडली. राठरचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंदशी असल्याचे स्पष्ट झालं.

महिला डॉक्टर Delhi Red Fort Blast

7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये कार्यरत असलेली लखनऊची एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. सध्या तिची ओळख पोलिसांनी सार्वजनिक केलेली नाही.

अहमद मोहियुद्दीन सैयद

7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने अहमद मोहियुद्दीन सैयद नावाच्या डॉक्टरला पकडलं. हा डॉक्टर हैदराबादचा राहणारा आहे.हा डॉक्टर रिसिन नावाचं एक खतरनाक विष बनवत होता. त्याने दिल्ली आजादपुर मंडी, अहमदाबादचं नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालय सारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.

डॉ. मुझमिल शकील

10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. तो अल-फलाह यूनिवर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. बॉम्ब बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. मुझमिलच्या दुसऱ्या ठिकाणावर छापा मारला असता तिथेही 2563 किलो स्फोटकं सापडली. शकीलचा संबंध जैश सारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे असं फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं.