Delhi Red Fort Blast : दहशतवादी शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन; अंडरवर्ल्डच्या संपर्कात कशी आली?

Delhi Red Fort Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देश हादरला आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यानंतर तिची कसून चौकशी केली असता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाहीन हिचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस आलं आहे. महारष्ट्रातील एका व्यक्तीसोबत तिचे लग्न झालं होत, त्यानंतर २ वर्षातच तिचा घटस्फोट सुद्धा झाला. मात्र या कालावधीत ती राज्यातील अनेक लोकांच्या संपर्कात राहीली असल्याचे बोललं जातेय.

कोण आहे शाहीन शाहिद? Delhi Red Fort Blast

डॉक्टर शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. शाहीन ने प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजमधून जानेवारी 2003 मध्ये एमबीबीएस आणि डिसेंबर 2005 मध्ये एमडी केली. या शिक्षणानंतर तिची लोकसेवा आयोगामार्फत निवड झाली. ऑगस्ट 2006 मध्ये जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजमध्ये फार्माकोलॉजी विभागात ती रुजू झाली. त्यानंतर वर्ष 2009-10 मध्ये कन्नौज मेडिकल कॉलेजमध्ये तिची बदली झाली. तर सहा महिन्यांनी ती पुन्हा जीएसव्हीएम कॉलेजमध्ये परतली. Delhi Red Fort Blast

शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. मात्र शाहिन शाहिदीच्या कारमधून AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या होत्या. शाहीनने 2013 साली महाराष्ट्रातील जफर हयातशी लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटापूर्वी काही काळ ती महाराष्ट्रात राहत होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या असून, दोन्ही राज्यांमध्ये या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. शाहीन हि दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलच्या संपर्कात कधी आली याचा उलगडा झालेला नाही. परंतु ती सुरुवातीला डॉ. परवेज सईदच्या संपर्कांत आली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.