Delhi Red Fort Blast : देशभरात दहशतवादी हल्ल्याचा कट? तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Delhi Red Fort Blast
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर झालेल्या स्फोटामुळे (Delhi Red Fort Blast) संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. धावत्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता या स्फोटानंतर डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते.

कोण आहे शाहीन शाहिद – Delhi Red Fort Blast

डॉक्टर शाहीन शाहिद जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेच्या जमात उल मोमिनतची कमांडर होती. शाहिना एका प्रतिष्ठित रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती, ज्यामुळे तिच्यावर कोणालाही संशय आला नाही. मात्र शाहिन शाहिदीच्या कारमधून AK-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आल्या होत्या. शाहीनने 2013 साली महाराष्ट्रातील जफर हयातशी लग्न केले होते. मात्र 2015 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटापूर्वी काही काळ ती महाराष्ट्रात राहत होती अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाहिन महाराष्ट्रात नेमकी कुणाच्या संपर्कात होती याची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की, देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत.

दरम्यान, दिल्ली स्फोटादरम्यान (Delhi Red Fort Blast) वापरण्यात आलेली कार हा डॉ मोहम्मद उमर हाच चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र उमरच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत होता. डॉ. उमर तपास यंत्रणांच्या सर्तकतेमुळे घाबरला होता त्यामुळं पॅनिक अटॅकमुळं त्याने लाल किल्ल्याजवळचा स्फोट घडवला असल्याचे समोर येत आहे. मात्र त्याच टार्गेट लाल किल्ला नव्हताच, असा संशय तपास यंत्रणांना आहे. उमरला कार घेऊन दुसरीकडे जायचे होते. मात्र एका अपूर्ण आयडीमुळं चालत्या गाडीत स्फोट झाला अशी माहिती समोर येत आहे.