औरंगाबाद | मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी यांच्याकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मराठवाड्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची स्थापना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत निवेदन देऊन चर्चा देखील केली.
औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. परंतु मराठवाड्यामध्ये एम्स ची गरज आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अंतर्गत हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.
मराठवाड्यात एम्स ची स्थापना झाली तर विभागातील रुग्णांना सुपरस्पेशालीटी उपचार मिळतील त्याचबरोबर विभागातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्याही वाढतील. एम्स मुळे फक्त वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण मिळणार नाही तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची जागा देखील भरून निघेल. यामुळे रोजगार निर्मिती होऊन फॅकल्टी आणि नाॅन फॅकल्टी अशा पदांची जवळपास 3 हजार पदे भरली जातील. विभागातील आरोग्य यंत्रणेतील मूलभूत सुविधा अधिक भक्कम हाेतील, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण मिळण्यास मदत होईल, असे डाॅ. कराड यांनी या निविदेत नमूद केले आहे.