नवरात्रीत “हाॅरर शो” साठी भाड्याने ग्रेडसेपरेटरची पालिकेकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील पोवई नाक्यावर असलेला ग्रेडसेपरेटर मंडळाचा देखावा दाखविण्यासाठी भाड्याने मागण्यात आलेला आहे. याबाबतचा अर्ज सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बाल गोपाल गणेश मंडळाने दिले आहे. नवरात्र उत्सवात ग्रेडसेपरेटर भाड्याने घेवून त्यामध्ये “हाॅरर शो” दाखविणार असल्याचे अर्जात म्हटले आहे. या मागणीमुळे सध्या ग्रेडसेपरेटरच्या कामावर सातारकरांकडून टीकस्त्र होवू लागले आहे.

मुख्याधिकारी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, नवरात्र उत्सवात “हाॅरर शो” दाखविण्यसाठी बालगोपाल मित्र मंडल रविवार पेठ सातारा आपणास विनंती करत आहोत. गेली पंधरा वर्षापासून आमचे मंडळ नवरात्र उत्सवामध्ये देखावे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत असते. आपल्या सातारा येथील पोवई नाक्यावर करण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचा वापर सातारा मधील नागरिक खूप कमी प्रमाणात करत आहेत. तसेच या ग्रेड सेपरेटर मधून दिवसातून जेमतेम फक्त 10 ते 20 वाहनेच जात असतात.

नवरात्र उत्सवामध्ये सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातून नागरिक या नवरात्र उत्सवात आमचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. यावर्षीच्या नवरात्र उत्सवाच्या देखाव्याबाबत आज झालेल्या मंडळाच्या बैठकीमध्ये या ग्रेड सेपरेटर मध्ये “हॉरर शो” देखावा उभा करण्याचे नियोजन केले आहे. तरी सातारा नगरपालिकेने आमच्या या देखाव्यासाठी कमी वापरात असणारा हा ग्रेड सेपरेटर आमच्या मंडळाला 9 दिवसासाठी भाड्याने देण्यात यावा. या ग्रेड सेपरेटरचे असणारे भाडे मंडळाच्या वतीने देण्यात येईल तरी नगरपालिका प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक आमच्या विनंतीचा विचार करावा व हा ग्रेड सेपरेटर नऊ दिवसासाठी आम्हाला भाड्याने देण्यात यावा.