मागच्या काही वर्षांमध्ये कोरोना अख्या जगभरात नाकीनऊ आणलं होतं. संपूर्ण जग या साथीच्या थैमानामुळे काहीसे थांबून गेल्यासारखं झालं होतं मात्र तुम्हाला माहिती आहे का एक रोग असा आहे जो कोविड पेक्षाही जास्त धोकादायक आहे. एका संशोधनात असं सिद्ध झालं असून हा रोग केवळ मृत्यूला आमंत्रित करत नाही तर तो दीर्घकालीन तुमच्या शरीरावर परिणाम करतो. एका संशोधनात आढळून आल्यानुसार डेंग्यू हा कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. याचं कारण काय आहे ? नेमका कोणता परिणाम आपल्या शरीरावर होतो? चला जाणून घेऊया संशोधकांचा काय म्हणणं आहे?
हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की डेंग्यूच्या साथीचा थैमान सुरू होतं. या रोगावर वेळीच जर उपचार झाला नाही तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. योग्य उपचार झाल्यास डेंग्यू चा रुग्ण कसा बसा बरा होतो परंतु या रोगाचा प्रभाव त्या व्यक्तीवर फार काळ राहतो. कारण डेंग्यूच्या तापामुळे हृदयाशी संबंधित आजाराचा धोका वाढतो असे संशोधनातून समोर आले आहे.
सिंगापूर येथील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली संशोधन झाले असून या संशोधनात असं समोर आलं आहे की डेंगूच्या रुग्णांना कोविड-19 च्या तुलनेत हृदयविकाराचा धोका 55% जास्त आहे. जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 11,700 पेक्षा अधिक डेंग्यू रुग्ण आणि बारा लाखांहून अधिक कोविड-19 च्या रुग्णाची चाचणी आणि वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देतानानानयांग टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी मधील संसर्गजन्य रोग मॉडलिंगचे सहाय्यक प्राध्यापक लिम जु ताओ यांनी सांगितले की डेंग्यू हा जागतिक स्तरावर सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. दीर्घकालीन आरोग्य समस्या ही चिंतेची बाब आहे. माध्यमांनी सादर केलेलया रिपोर्टनुसार महाराष्ट्र आणि दिल्ली सह देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे अशा स्थितीत अहवाल आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण करतो.
कोविड-19 च्या साथी नंतर हृदयविकाराचा झटका म्हणजे कोविड 19 समीकरण जोडलं जात होतं. कोविडच्या साथी नंतर हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. कारण दीर्घ काळापर्यंत या तापामुळे रक्तामध्ये गुठळी निर्माण होते. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज सुरू होते. परंतु डेंग्यू हा कोविड-19 पेक्षा जास्त धोकादायक आहे. हा रोग कोविड पेक्षा प्रभावी असल्याचे सांगितले गेले आहे. याचाच अर्थ आगामी काळात डेंग्यू हाही हृदयविकाराचे प्रमुख कारण मानले जाऊ शकतो. सिंगापूर येथील शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार डेंग्यू झाल्यानंतर हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण या अहवालानुसार शास्त्रज्ञांना असा आढळून आले आहे की, डेंगूच भविष्यात शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात अनेक प्रकरणांमध्ये गंभीर डेंगी मूळ यकृताचे नुकसान मायोकार्डिटिस आणि न्यूरोलॉजिकल समस्या देखील निर्माण होऊ शकतात.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डेंग्यूमुळे रक्तस्त्रावी ताप येतो ज्यामुळे रक्त स्त्राव आणि प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे अवयव खराब होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका तर वाढतोच याशिवाय न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि स्मृती भ्रंश यासारख्या आजारांचा धोका 213 टक्क्यांनी वाढतो. डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे जो संक्रमित डासाच्या चावण्याद्वारे लोकांमध्ये पसरतो तर COVID-19 हा SARS-CoV-2 या विषाणूमुळे होतो