हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Desi Jugaad) देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. प्रत्येक प्रोब्लेमवर एक सोल्युशन यांच्याकडे तयार असतंच. अशा बऱ्याच चतुर लोकांच्या चतुराईचे नमुने सोशल मीडियावर पहायला मिळतात. आजकाल व्हायरल व्हायला काहीही कारण चालतं. मग कुणाची हुशारी का चालणार नाही? त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकापेक्षा एक शक्कल लढवणाऱ्यांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यातील काही व्हिडीओ जरा विनोदीच असले तरी काही मात्र थक्क करणारे असतात.
व्हिडीओ बनवायचा म्हणजे मोबाईल हवा आणि त्याच मोबाईलचा डिस्प्ले गेला तर??? बापरे… नुसतं वाचून काही लोकांच्या काळजाचं पाणी झालं असेल. मोबाईलचा डिस्प्ले गेला तर मोबाईल वापरणं अवघड होत. (Desi Jugaad) पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला अवघड असं काहीच वाटणार नाही. हा व्हिडीओ पाहून एखादा इंजिनियर स्वतःची डिग्रीच फाडून टाकेल. कारण या तरुणानं टच खराब झालेल्या मोबाईलचा वापर करण्यासाठी लढवलेली शक्कल खरोखरच अचंबित करणारी आहे.
पहा व्हिडीओ (Desi Jugaad)
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एका मुलाने मोबाईलचा डिस्प्ले खराब झाला म्हणून त्याला माऊस लावला आहे. अनेकदा फोन पडल्याने त्याची स्क्रीन जाते आणि मग त्याच्या दुरुस्तीचा खर्च अंगावर पडतो. जो खूप खर्चीक असतो. पण फोनच्या स्क्रीनला टच न करता मोबाईल वापरता येईल असा जुगाड या तरुणाने करून दाखवला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
(Desi Jugaad) या व्हिडिओत एका मुलाच्या हातात तुटलेला फोन दिसतोय. दरम्यान, त्याला हा खराब डिस्प्ले असलेला फोन कसा वापरतोस? असे विचारले असता तो त्याच्या खिशातून माऊस काढतो आणि त्याला जोडून दाखवतो. थक्क करणारी बाब म्हणजे, मोबाईल नुसता माऊस जोडत नाही तर हा तरुण फोनचा वापरही करतोय.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर Daily_over_dose नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत अनेक नेटकऱ्यांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘मी हे करून पाहिलंय रे..’. (Desi Jugaad) तर आणखी एकाने लिहिलं, ‘तू मला या माऊसने टाइप करून दाखव.. तरच मानलं तुला’. अन्य एकाने लिहिले, ‘काय मूर्खपणा आहे? फक्त कर्सर हलवून फोन चालतो का?’