Desi Jugaad: अस्सल देशी जुगाड ! पाहून तुम्ही म्हणाल, काय नेक्स्ट लेव्हल क्रिएटिविटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Desi Jugaad: भारतामध्ये जुगाडू लोकांची काही कमी नाहीये. सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक जुगाडू लोक आणि त्यांचा जुगाडूपणा व्हायरल होत असतो.आज आम्ही तुम्हाला अशाच काही जुगाडू लोकांचे कारनामे दाखवणार आहोत ज्यामुळे तुम्ही नक्की म्हणाल की ही काय डोक्यालिटी (Desi Jugaad) ?

चालते फिरते सलून (Desi Jugaad)

यापूर्वी तुम्ही गावागावांमध्ये झाडाखाली बसलेले न्हावी पाहिले असतील मात्र फिरते सलून तुम्ही पाहिले आहे का? एका व्यक्तीने आपल्याTVS XL ला एका व्यक्तीने चालते फिरते सलून बनवले आहे. हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला कुठेही आपली गाडी उभी करतो आणि मिळेल तिथे आरसा लावून हा व्यक्ती त्याचे काम करतो. त्याने आपल्या गाडीला मॉडीफाय केलं असून मागे टेकण्यासाठी खुर्ची सारखा रॉड देखील लावला आहे.

बाईकला केली टमटम

आजही खेडेगावात शेअर ऑटो हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो आणि खेड्यातल्या माणसांना शहराला स्वस्तात नेऊन जाण्यासाठी हा शेअर ऑटो परवडणारा ठरतो. मात्र शेअर ऑटोमध्ये खचाखच माणसं कोंबलेली अनेकदा बघायला मिळतात. मात्र एका व्यक्तीने एक जुगाड केला असून त्याने आपल्या बाईकलाच शेअर सेटिंग बाईक बनवली आहे. एका रिक्षामध्ये जेवढे प्रवासी बसतात तेवढेच प्रवासी या बाईकमध्ये बसतात . एवढेच नाही त्या रिक्षा प्रमाणे (Desi Jugaad) याला छत आणि पकडण्यासाठी हॅण्डलही आहे. पण अर्थातच पावसापाण्याच्या दिवसांमध्ये ही सवारी परवडणारी नसेल. याप्रमाणे एका बाईक वरून हा व्यक्ती सहा जणांना घेऊन जातो आहे.

लॅपटॉपलाही थंडावा

वर्क फ्रॉम होम ही कल्पना कोरोना काळ झाला तरी अद्यापही काही ठिकाणी लागू आहे. तुम्हाला माहितीच असेल की घरात लॅपटॉप घेऊन काम करणारे अनेक जण आहेत. मात्र दिवसभर हा लॅपटॉप चालू राहिला तर त्याची बॅटरी ही खूप गरम होते आणि पर्यायाने लॅपटॉपही गरम होतो. म्हणूनच एका व्यक्तीने दोन (Desi Jugaad) लोड ठेवले असून त्याच्यामध्ये उभा फॅन ठेवला आहे. आणि आपल्या लॅपटॉपला थंड करण्यासाठी त्या फॅन वर लॅपटॉप ठेवला आहे. आपल्या लॅपटॉप ला थंड करण्याचा हा काही अजब फंडा या व्यक्तीने वापरला आहे.

कुलरची cool ट्रिक

यंदाच्या वर्षाची गर्मी किती जास्त प्रमाणात होती हे काही वेगळं सांगायला नको म्हणूनच कुलर घरात एकच असेल आणि रूम अनेक असतील तर मग काय पर्याय आहे? दुसरा कुलर विकत घेण्यापेक्षा एका व्यक्तीने कुलरच्या बाजूला चक्क पॅन्ट बांधली आहे आणि त्याचा एक पाय एका खोलीत तर दुसऱ्या पाय दुसऱ्या खोलीत केला आहे त्यामुळे दोन्ही खोलीत एका कुलर मुळे हवा येते.

कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही

कांदा कापताना डोळ्यांमध्ये किती पाणी येतं हे काही वेगळं सांगायला नको मग हे पाणी येऊ नये म्हणून एका व्यक्तीने चक्क डोक्यावर हेल्मेट घालून कांदा कापायला सुरुवात केली आहे.