दंगलीत झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले येईल; देवेंद्र फडणवीसांची माहिती

fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी नागपूरमध्ये (Nagpur) औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद उफाळून आला. याठिकाणी दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीमध्ये परिसरातील वाहनांचे, दुकानांचे मोठे नुकसान झाले. या सर्व घटनेनंतर आज पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमध्ये येऊन वरिष्ठ पोलीस आयुक्तांशी बैठक घेतली. तसेच माध्यमांशी देखील संवाद साधत परिस्थितीचा आढावा दिला.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं त्यांना 3 ते 4 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे ते सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल” असे फडणवीस यांनी सांगितले.

त्याचबरोबर, “नागपूरमध्ये जी घटना झाली, त्याचा संपूर्ण आढावा नागपूरचे पोलीस आयुक्त, एसपी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत मी घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्यासंदर्भातील हा आढावा होता.” अशी माहिती त्यांनी दिली.

यासह, “सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे. त्यांनी दंगा भडकवला. 68 पोस्ट आयडेंटिफाय होऊन डीलिट झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेतली जात आहे. ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल.” अशी माहिती फडणवीसांकडून देण्यात आली.

दरम्यान, “ज्यांचं नुकसान झालं, गाड्या फुटल्या, अर्धवट गाड्या फुटल्या त्या सर्वांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल. आता जो काही आपण निर्बंध घातले आहेत. त्यामुळे थोडं जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न राहील. त्याचवेळी पोलीस सजग राहील. कुणी परत असा प्रयत्न केला तर कडक कारवाई केली जाणार आहे. जे नुकसान झालं ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल.” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.