Wednesday, October 5, 2022

Buy now

महाविकास आघाडीनेच महाराष्ट्राला मागे नेले; फडणवीसांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकॉइन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधकांकडून यावरून शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याला महाविकास आघाडीचं जबाबदार धरले आहे. येव्हडच नव्हे तर महाविकास आघाडीनेच महाराष्टाराला मागे नेले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मुंबईत आज लघु उद्योग भारती प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वेदांत वरून ठाकरे सरकारवर टीका केली. तत्कालीन ठाकरे सरकारनेच वेळकाढूपणा केल्याने हा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप फडणवीसांनी केला . आम्ही तो प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात पत्रव्यवहारही केला होता. पण अनिल अग्रवाल यांनी आता उशिर झाल्याचे सांगितले असे फडणवीस म्हणाले आहेत.

हा प्रकल्प गुजरातला गेला. गुजरात काय पाकिस्तान आहे का?? आपलाच छोटा भाऊ आहे असं फडणवीस म्हणाले. तर ज्यांनी या प्रकल्पासाठी काहीच केलं नाही ती लोक आज आमच्याकडे बोट दाखवत आहेत, पण तुमचं कर्तृत्व काय असा सवाल फडणवीसांनी महाविकास आघाडीला केला. ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे. मात्र पुढील दोन वर्षात महाराष्ट्राला निश्चित पुढे नेणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.