हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत शेवटच्या सत्रात महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा, अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला. “शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणतात कि संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजांऊनच रूप आहे. आणि त्यांनी शिवरायांसारखा हिरा या ठिकाणी जन्माला घातला. राम आणि लक्ष्मण खोटारडे आहेत. सात महिने आगोदर सीतामातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोर खात बसतो. “कुछ हुआ तो क्या हमने तुमको देखा तुमने हमको देखा” हे बोलले जाते. राऊतांकडून छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का केला जात नाही? असा सवाल यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती उदयनराजेंना देखील ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून पुरावे मागणारे लोकही आपल्याकडे आहेत. हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान नाही. आज आपण ज्यावेळी असं म्हणतो कि हो आमच्यावर अफजल खानाच्या फौज पाठवा. म्हणजे तुम्ही स्वताला छत्रपती समजता. हा अपमान नाही का? शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणतात कि संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजांऊनच रूप आहे. आणि त्यांनी शिवरायांसारखा हिरा या ठिकाणी जन्माला घातला. आता कोणाची तुलना आपण करतोय. सर्व माता महान असतात. कुठल्याच मातेचा अपमान नाही. पण हि तुलना होऊ शकते का? असा सवाल यावेळी फडणवीसांनी उपस्थित केला
यावेळी फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली ते म्हणाले की, रूट जेचा सामनात छत्रपतींचा उल्लेख शिवाजी असे करतात. राऊतांकडून छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का केला जात नाही? तसेच सुषमा अंधारे म्हणतात कि राम आणि लक्ष्मण खोटारडे आहेत. सात महिने आगोदर सीतामातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोर खात बसतो
“कुछ हुआ तो क्या हमने तुमको देखा तुमने हमको देखा” हे बोलले जाते. असा देवांचा अपमान करणाऱ्या तुमच्या पक्षातील नेत्या म्हणतात हे चालते का? हा देवाचा अपमान नाही का? असा सवाल करत फडणवीसांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाना साधण्यात आला.