औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणे सरकारसाठी दुदैवी!! मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली खंत

devendra fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन छेडत संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज छत्रपती शिवाजी महाराज (Chattrapati Shivaji Maharaj) यांच्या मंदिराचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कबरीबाबत आपली भूमिका नोंदवली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची ठाम भूमिका

राज्यात सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ दिले जाणार नाही. इथे महिमामंडन होईल तर फक्त शिवरायांचे होईल. औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही, औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणे महाराष्ट्र सरकारसाठी दुदैवी आहे, पण ती जबाबदारी आम्हाला पार पाडावी लागत आहे. मात्र, महाराष्ट्रात औरंगजेबाचा उदात्तीकरण कधीही होणार नाही.”

त्याचबरोबर, “औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने 50 वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. एक वचन तुम्हाला देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न चिरडून टाकू, हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोर देतो,” असे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे.

महत्वाचे म्हणजे,”शिवरायांचे 12 किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, मोदींनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे, लवकरच हा दर्जा मिळेल. यासह जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले तिथे देखील स्मारक करत आहेत. तुळापूर इथे देखील मोठे स्मारक आपण करत आहोत. उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे, आग्र्याला स्मारक व्हावे म्हणून निधी दिला आहे, पानिपत इथे देखील एक स्मारक व्हावे म्हणून प्रयत्न करत आहोत” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, आज मोठ्या उत्सवात भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवमंदिराचे लोकार्पण झाले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आहेत प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.