राज्यात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप; फडणवीसांनी ऊर्जा विभागाला दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगीकरणाला विरोध करत आजपासून पुढील तीन दिवस महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या संपाचा चांगलाच फटका बसू लागला असून राज्यात काही ठिकाणी वीज पुरवठा हा बंद झाला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 30 संघटनांनी हा संप पुकारला असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला महत्वाचे आदेश दिले आहेत.

राज्यातील वीज वितरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आजपासून 5 व 6 जानेवारी या तीन दिवसात अतिरीक्त वीज पुरवठ्याची गरज भासणार आहे. त्याअनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी बैठक घेऊन त्यांच्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान फडणवीसांनी ऊर्जा विभागाला राज्यात कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामुळे अतिरिक्त विजेचा पुरवठा करून ठेवावा, असा महत्वाचा आदेश दिला आहे. दरम्यान संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईची नोटीसही देण्यात आली आहे. मात्र, नोटिसीला न जुमानता कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत राज्य सरकार व सर्वसामान्यांना शॉक दिला आहे.