खडसेंच्या भाजप प्रवेशाची फडणवीसांना माहितीच नाही?? चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. दिल्लीत जाऊन माझा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश होईल असं खुद्द एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. तसेच भाजप नेत्यांसोबत माझी चर्चा ५-६ महिन्यापासून सुरु आहे असेही त्यांनी जाहीर करून टाकलं होते. याबाबत एकनाथ खडसेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याना विचारलं असता अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवले नाही. पक्ष आम्हाला ज्या वेळेस कळवेल त्यावेळेस आम्ही त्यांचे स्वागतच करू असं उत्तर फडणवीसांनी दिले. यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाची फडणवीसांना माहितीच नाही का?? असा प्रश्न निर्माण झालाय.

प्रसारमाध्यांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ खडसेंच्या घरवापसीबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन कोणीही प्रवेश करत असेल तर त्यांना कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु अधिकृतरित्या पक्षाने आम्हाला कळवले नाही. अधिकृतरित्या पक्ष आम्हाला ज्या वेळेस कळवेल त्यावेळेस आम्ही त्यांचे स्वागतच करू असं मोघम उत्तर देऊन फडणवीस यांनी विषय संपवला. परंतु जे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचे नंबर एकचे नेते आहेत त्यांना पक्षाने एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबद्दल अजूनही का कळवलं नसेल असा प्रश्न निर्माण होतोय..

एकनाथ खडसे हे खरं तर देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक मानले जातात. भाजपमध्ये असतानाही दोन्ही नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली होती. मात्र आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसीचा निर्णय घेतल्याने इतिहासाची पुनरावृत्त्ती होणार का ते पाहावं लागेल.

दुसरीकडे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही खडसेंच्या भाजप प्रवेशावर मोजक्या शब्दात प्रतिक्रया देत टोला लगावलेला आहे. एकनाथजी खूप मोठे नेते आहेत. खडसेंचा पक्षप्रवेश माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही. ते फार मोठे आहेत. त्यांच्याविषयी फार बोलणं संयुक्तिक नाही. एकनाथ खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहे, असे ते म्हणतात. त्यामुळे ते दिल्लीला, जात आहेत, येत आहेत. आता त्यांनी सांगितलंय 15 दिवसांनी प्रवेश घेणार आहे. वाट बघू असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंना टोला लगावला आहे.