गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर!! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून त्यानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरु आहे. कोकणी माणूस एकवेळ नोकरीवर लाथ मारेल, पण कोकणात तो गणपती उत्सवासाठी जाणार म्हणजे जाणारच… कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकार कडून अनेक विशेष ट्रेन आणि बस चालवण्यात येत आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत कोकणवासीयांना गुडन्यूज दिली आहे. कोकणात मागील वर्षापेक्षा जास्त 267 रेल्वेच्या फेऱ्या होतील असं फडणवीस यांनी म्हंटल आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी केंद्र सरकार आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी यावर्षी मुंबईहून २६७ रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. खास करून कोकणात जाणारे मुंबईकर दरवर्षी गणेशोत्वस काळात कोकणात जातात, त्यांना या स्पेशल ट्रेनचा फायदा होईल. दरवर्षी पेक्षा यंदा खूप मोठ्या प्रमाणावर गणेशोत्वसानिमित्त आम्ही रेल्वेगाड्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल. चाकरमानी आणि कोकणात राहणाऱ्या मुंबईकरांसाठी ही मोठी व्यवस्था केली आहे,असं फडणवीस यांनी म्हंटल.

कोकणात मोदी एक्सप्रेस चीही सुविधा

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. मात्र यंदा एक नाही, तर दोन दोन मोदी एक्सप्रेस कोकणात धावणार आहेत. या मोदी एक्सप्रेस मध्ये भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. कोकणाकडे जाणारी पहिली मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. रत्नागिरी आणि कुडाळ येथे या ट्रेनला थांबा असेल आणि शेवटचे स्टेशन सावंतवाडी असेल. तर कोकणाकडे जाणारी दुसरी मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. वैभववाडी आणि कणकवली या स्थानकांवर या ट्रेनला थांबा असेल. या दोन्ही रेल्वे मधील आसन क्षमता मर्यादित असल्याने प्रवाशांनी वेळेत तिकिटे बुक करणे महत्वाचे आहे.

यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील लोकांनी भाजप आणि राणे कुटुंबाला पूर्ण पाठिंबा दिला. या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आम्ही मोदी एक्सप्रेस या रेल्वेसेवेचा आणखी विस्तार करत असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.