मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री चालवत असलेल्या Mercedes गाडीची PUC संपलेली? कारवाई होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बहुचर्चित समृद्धी महामार्गावर गाडीने प्रवास केला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी जातीने महामार्गाची पाहणी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच गाडीत होते.

यावेळी फडणवीस यांनी तब्बल 529 किमी कार चालवली. तसेच फडणवीसांनी त्याचे व्हिडिओही ट्विट केले. फडणवीसांनी चालवलेल्या मर्सिडीझ कारची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. यावरून काँग्रेसने निशाणा साधला असून त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत प्रश्नही उपस्थित केला आहे. यावेळी मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री चालवत असलेल्या गाडीची PUC संपलेली असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटले आहे. आता पोलीस मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का असा सवाल नेटकरी करत आहेत. ऑनलाईन शोध घेतल्यानंतर सदरील गाडी Mercedes benz कंपनीची असून तिची किंमत 2 कोटी आहे. कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्टर यांच्या नावावर हि गाडी असून Axix Bank ने यासाठी फायनान्स केलं असल्याचं दिसत आहे.

https://www.facebook.com/100068907622179/posts/pfbid02fg1w3HQxyCQWbgtVbXVYL6nVYFTY1ryaQpZfEoXfRYqJ7bVW2pXGLnu84TT5aLZTl/?mibextid=Nif5oz

गाडीची किंमत 2 कोटी 2 लाख रुपये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वापरलेली गाडी Mercedes-Benz G350d ची एक्स शोरूम किंमत 2.02 कोटी इतकी आहे. तसेच या कारमध्ये 3.0 लिटर 6 सिलेंडर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 285 PS पॉवर आणि 600 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

7.4 सेकंदात100 किमी/ताशी वेग

फडणवीसांनी चालवलेली हि मर्सिडीज कार जी-क्लास ऑफ-रोडिंगसाठी ओळखली जाते. ही कार फक्त 7.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडते. या कारमध्ये क्लायमेट कंट्रोल, नऊ एअरबॅग्ज, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यासारखे फीचर्स आहेत. या कारमध्ये दोन 12.3-इंच डिस्प्ले, ड्रायव्हर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सारखे फीचर्सही आहेत.

Mercedes-Benz Car Detailsराज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गावर आज प्रवास जी कार वापरली आहे यावर काँग्रेसने टीका केली असून बिल्डरची गाडी चालवतायत मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का? असा सवाल फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसने केलेला आहे.

Facebook Comment