फडणवीसांच्या Tweet ने खळबळ!! राज्यातील सरकार कोसळणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असा वावड्या उठल्या होत्या. अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या बातम्या फेटाळून लावल्या असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

फडणवीसांचे ट्विट नेमकं काय?

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वरून २ फोटो शेअर केले आहेत. या फोटो मध्ये ते कार्यालयीन कामकाज करताना दिसत आहेत. मिशन नो पेंडेन्सी असा हॅशटॅग त्यांनी यावेळी दिला आहे. Office work. Clearing pendencies.. कार्यालयीन कामकाज.. असं त्यांनी म्हंटल आहे. फडणवीसांच्या टेबलावर ढीगभर फायली सुद्धा दिसत आहेत. या फायलींवर फडणवीस सह्या करत आहेत. फडणवीस सर्व पेंडिंग काम पूर्ण करत असल्याने ट्विट शेअर केल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षवरील निकाल कधीही समोर येऊ शकतो. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार भाजपसोबत जाणार अशा वावड्याही गेल्या काही दिवसांपासून उठत आहेत. मात्र आपण भाजपसोबत जाणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. अजितदादांच्या या स्पष्टीकरणानंतर काही तासांतच फडणवीसांनी पेंडिंग कामे पूर्ण करत असल्याचे ट्विट केलंय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील सरकार टिकणार कि जाणार अशा चर्चाना उधाण आलं आहे.