नवी दिल्ली । डायरेक्टर जनरल ऑफ गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (DG-GST) इंटेलिजन्सने कॅब अॅग्रीगेटर ओला आणि उबर (Ola-Uber) यांच्याविरूद्ध तपास सुरू केला आहे. शेकडो कोटी रुपयांचा टॅक्स चुकवल्याप्रकरणी डीजी-जीएसटीने या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना समन्स पाठविले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, उबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर 800 कोटी रुपयांची टॅक्स चोरी आणि ओला कॅबने 300 कोटी रुपयांचा टॅक्स चुकल्याचा आरोप आहे.
डीजी-जीएसटी इंटेलिजन्समार्फत त्यांची चौकशी सुरू असल्याची पुष्टी दोन्ही कंपन्यांनी केली आहे. परंतु, टॅक्स पेमेंटच्या रकमेबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
दोन्ही कंपन्यांकडे एवढी मोठी कर देयता कशी होती?
दोन्ही कंपन्यांची कर चुकवण्याची पद्धत एक प्रकारची आहे. असे म्हटले जात आहे की जीएसटी इंटेलिजन्सला असे आढळले आहे की, उबर इंडिया आणि ओला कॅब त्यांच्या ड्रायव्हर्सना दिलेल्या इन्सेन्टिव्हजवर जीएसटी देत नाहीत. या विषयाची माहिती असलेल्या एका सूत्रांनी सांगितले की, ‘या कंपन्या त्यांच्या चालकांना दिल्या जाणा इन्सेन्टिव्हजवर जीएसटी जमा करत नाहीत आणि गेली कित्येक वर्षे हे घडत आहे. म्हणूनच त्यांच्याकडून टॅक्स चुकवण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे या कंपन्यांनी राईड रद्द केली असली तरी कोणताही जीएसटी दिलेला नाही. जेव्हा एखाद ग्राहक आपली राइड रद्द करतो तेव्हा त्याच्याकडून शुल्क आकारले जाते. या कंपन्यांनी या रकमेवर देखील कोणताही जीएसटी जमा केलेला नाही. डीजी-जीएसटी इंटेलिजन्सला असे आढळले आहे की, या कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा टॅक्स भरलेला नाही. आता त्यांच्यावर 15 टक्के दराने टॅक्स आकारला जात आहे.
दोन कंपन्यांनी काय म्हटले?
मनीकंट्रोलने त्याच्या एका अहवालात उबरच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने विचारले की, ‘उबर नियमांचे पालन करणारी कंपनी आहे. आम्ही टॅक्स अधिकाऱ्यांशी जवळून काम करीत आहोत आणि त्यासंदर्भातील सर्व माहिती देत आहोत. यावर लवकरच आम्ही आपला प्रतिसाद देत आहोत ‘
त्याचप्रमाणे ओलाने या चौकशीविषयी सांगितले की, आमच्याकडे टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस आहे. हे 2017 पूर्वीच्या टॅक्सशी संबंधित आहे. टॅक्स अधिकाऱ्यांना आम्ही त्वरित सर्व माहिती देत आहोत आणि त्यांना स्पोर्ट करीत आहोत.
नुकताच वित्त सचिव अजय भूषण पांडे (Ajay Bhushan Pandey)यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आम्ही प्रामाणिक करदात्यांचा आदर करू. परंतु जे लोक सिस्टमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाचवले जाणार नाही. मला असे वाटते की, सिस्टमसह खेळणार्या लोकांना मेसेज पाठविला गेला आहे. आता वेळ बदलली आहे आणि त्यांना व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आपली डाळ शिजवण्याची संधी मिळणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.