कोल्हापूर प्रतिनिधी । लहानपणी आपण कधी आपल्या वडिलांना त्यांच्या कामाच्या जागी घेऊन जा म्हणून हट्ट केला असेल. काहींचा हा हट्ट पुरवला गेलाही असेल. अशावेळी आपले वडील जेथे काम करतात तेथे काम करणाऱ्या सगळ्यांनी काहींचे लाड सुद्धा पुरवले असतील. तुम्हाला कौतूकाने जवळ घेतलं असेल.अशी एक आठवण तुमच्याही आयुष्यात असणानारच. आपल्या लेकीच्या आयुष्यातला असाच काहीसा प्रसंग शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोशल फेसबुकवर शेयर केला.
सध्या दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी खासदार धैर्यशील माने सध्या दिल्लीत आहेत. मात्र यावेळी ते एकटे नसून त्यांची लाडकी लेक आदिश्री सुद्धा त्यांच्यासोबत आहे. खासदार माने यांनी आपल्या लेकीच्या कुतूहलपोटी आदिश्रीला थेट संसदवारी घडवली.
या संसद भेटीत अनेक बड्या राजकीय व्यक्तींसोबत आदिश्रीने गोड गप्पा मारल्या.काहींनी तिला मायने अगदी जवळ घेतले होते. संसदेत पार राजकीय दृष्ट्या पक्के विरोधी असणारे राजकीय नेते धैर्यशील माने यांच्या लेकीशी अगदी लहान होऊन तिच्याशी यावेळी भेटले. यावेळी प्रत्येकासोबत आदिश्रीने हट्टाने फोटो काढून घेतले.हा सगळा प्रसंग धैर्यशील माने यांनी कौतुकाने फेसबुकवर शेयर केला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट वायरल झाली सर्वत्र आदिश्रीवर प्रेमाचा वर्षाव लाईक आणि कंमेंटच्या रूपात सोशल मीडियावर होत आहे.
धैर्यशील माने यांनी शेयर केलेली हीच ती पोस्ट..
”आज आदिश्रीने दिल्लीमध्ये राजकीय धुरंधर व्यक्तींच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या. ईवल्याश्या आदिश्रीची उत्सुकता इतकी होती की तिने प्रत्येकांसोबत स्वतःचे फोटो घेतले. शिवसेना नेते व राज्यसभा खासदार मा. संजय राऊत, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रस अध्यक्षा, मा. सोनियाजी गांधी, मा. ना. प्रफुल्लजी पटेल, मा. ना. स्मृतीजी इराणी, मा. ना. रामदासजी आठवले, खासदार अमोलजी कोल्हे, खासदार नवनीत राणा, खासदार अगाथा संगमा आदी मान्यवरांसह आदिश्रीने गप्पा मारल्या.
कोण विरोधी? कोण सत्ताधारी? हे काही मनात न ठेवता सगळे आपलेच अश्या भावनेने ती सर्वांना भेटली, सर्वांचे आशीर्वाद घेतले. इतक्या लहान वयात आपल्या आदिश्रीला या राजकीय धुरंधरांकडून मिळालेली मायेची व आपुलकीची ही शिदोरी तिला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहील.”