Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा अखेर सुटला; धैर्यशील मोहिते पाटील आणि पवारांचं ठरलं!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर येत्या २ दिवसात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटलांनाच माढ्यातून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. माढ्यातून भाजपने आधीच रणजित निंबाळकर याना तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित निंबाळकर असा रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो.

सूत्रांच्या माहितीनुसार, अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बाळदादा मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये. यानंतर स्वता शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत १६ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

रामराजेंची मोहिते पाटलांना साथ??

शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील याना माढा लोकसभेचे तिकीट दिल्यास रामराजे निंबाळकर यांची साथ मिळतेय का ते सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. रामराजे निंबाळकर हे आत्ता जरी अजित पवार गट असले तरी रणजित निंबाळकर यांचे कट्टर विरोधक मानले जातात. रामराजे निंबाळकर आणि रणजित निंबाळकर यांच्यातील हाडवैर सर्वाना माहित आहे. भाजपने रणजित निंबाळकरांची उमेदवारी बदलावी अन्यथा मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशाराही रामराजेंनी भाजपला दिला होता. एवढच नव्हे तर काही दिवसांपूर्वी अकलूजला जाऊन त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट सुद्धा घेतली होती. त्यामुळे रणजित निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी रामराजे धैर्यशील मोहिते पाटलांना बळ देणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.