धनंजय देशमुखांचे थेट अजितदादांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने अख्या महाराष्ट्राला हादरून टाकले. आता या हत्येचा तपास पूर्ण झाल्यानंतर सध्या बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण या झालेल्या तपासावर संतोष देशमुख यांच्या भावाने काही प्रश्न मांडले आहेत. यासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अन बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान धनंजय देशमुख यांनी अजित पवार यांच्याकडे एक पत्र सादर केले अन त्यामध्ये एक मागणी केली आहे. तर ती कोणती मागणी आहे, हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.

धनंजय देशमुख यांनी मागणी –

धनंजय देशमुख यांनी मागणी केली आहे कि , संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि मकोका अंतर्गत ज्या आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सर्व आरोपी बीड कारागृहात आहेत. कारागृहात नुकत्याच घडलेल्या घटनांचा आम्ही साक्षीदार आहोत. आरोपींना नाशिक अन छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी हलवले जात आहे. तरी, हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यातील आरोपींना बीड कारागृहात ठेवलं जात का? याबाबत आम्ही विचारणा केली असून त्याचं उत्तर आम्हाला मिळणं अपेक्षित आहे,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

अजित पवार यांचे आश्वासन –

या भेटीच्या दरम्यान अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीने आवश्यक पाऊले उचलली जातील, असा विश्वास धनंजय देशमुख यांना दिला आहे. “आम्ही इतर ज्या मागण्या केल्या आहेत त्या गांभीर्याने घेवून त्यांची पूर्तता लवकरच होईल,” असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

अजित पवार काय म्हणाले –

अजित पवार म्हणाले कि , “एखाद्याला पक्षात घेताना त्याचं रेकॉर्ड तपासा. मी बीडच्या दौऱ्यावर येण्याआधी इथल्या एसपींकडून माझ्या दौऱ्यात जे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, त्यांचे रेकॉर्ड मागवून घेतले. आपण लोकांना काही गोष्टी सांगत असताना आपल्या जवळपास चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असू नयेत . एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पूर्ण पक्षाला अन त्या नेतृत्वालाही मोजावी लागते,” त्यामुळे अशा गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते.