वैद्यनाथ सहकारी कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार; पंकजा मुंडेंची घेणार भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखाना अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी जीएसटी आयुक्तालयाने साखर कारखान्याची तब्बल 19 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र आता या साखर कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेनी कंबर कसली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांनी साखर कारखाना वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या साखर कारखान्याकडून सरकारला प्रस्ताव पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचबरोबर, याप्रकरणाचा लवकरच तोडगा काढण्यासाठी धनंजय मुंडे स्वतः पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हणले जात आहे.

साधारण गेल्या 23 वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. मात्र आता हा साखर कारखाना अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या साखर कारखान्याला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः या साखर कारखान्याच्या प्रकरणात हस्तक्षेप नोंदवला आहे. लवकरच ते या प्रकरणासंबंधी संवाद साधण्यासाठी पंकजा मुंडे यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये कारखान्याला वाचवण्यासाठी दोघे भाऊ बहीण चर्चा करतील. अद्याप या भेटीसंदर्भातील अधिकृत माहिती समोर आलेले नाही.

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी कारखाना स्थापन केल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर या कारखान्याला उतरती कळा लागली. मुख्य म्हणजे, पुढे जाऊन पंकजा मुंडे यांची देखील राजकीय गणितं चुकल्यामुळे त्याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक गणितांवर पडला. आता हा साखर कारखाना पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या साखर कारखान्याला वाजवण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे कुठपर्यंत प्रयत्न करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.