लावणीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंसमोरच पोलिसांचा तरुणांवर लाठीचार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – गेल्या वर्षभरापासून आतुरतेनं वाट पाहणाऱ्या गणरायाचे आगमन झाले आहे. या बापाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे, त्यामुळे बेभान झालेल्या तरुणावर पोलिसांना लाठीचार्ज (police beaten youth) करावा लागला आहे.

बीडच्या परळीतील नाथ प्रतिष्ठानच्या गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे. माजी सामजिक न्याय मंत्री आ धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात पाहिल्याच दिवशी मोठी घटना (police beaten youth) घडली आहे. कलाकारांना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी एकच गोंधळ केला, त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज (police beaten youth) करण्यात आला. या कार्यक्रमातील अति उत्साही तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.

या ठिकाणी आठदिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री सिने तारका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, हेमांगी कवी, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड, पूनम कुडाळकर यांचा विवीध गाण्यावर भन्नाट डान्स झाला, तो पाहण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मराठी सिने अभिनेत्रींचे नृत्य पाहण्यासाठी गर्दी झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. यानंतर हि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज (police beaten youth) केला. यामध्ये काही तरुण मोठ्या प्रमाणात जखमी झाले. या लाठचार्जमुळे (police beaten youth) सांस्कृतिक कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी गालबोट लागले आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर