Dhanashree Verma : एका दिवसात नोटबंदी, लॉकडाउन होतं, मग फाशी का नाही? चहलच्या पत्नीची संतप्त पोस्ट

Dhanashree Verma
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसांत देशातील अनेक ठिकाणी मुलींवरील अत्याचार, बलात्कार आणि हत्येच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम बंगाल येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणाने (Kolkata Rape Case) तर संपूर्ण देश हादरला. नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी यासाठी देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. या प्रकरणामुळे कायद्यात बदल करून आरोपीना लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिची सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली आहे.

काय आहे धनश्री वर्माची पोस्ट –

धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. धनश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात आवाज उठवला आहे. बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, असे तिचे रोखठोक मत आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, ‘नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते, लॉकडाऊन एका रात्रीत लागू होऊ शकते, मग एका रात्रीत बलात्कार करणाऱ्याला फाशी का दिली जाऊ शकत नाही. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

यापूर्वी युझवेंद्र चहलनेही या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चहलने म्हंटल होते, फाशी द्यावी का? नाही, त्याचे पाय ९० अंशाच्या कोनात मोडले पाहिजेत. त्यांची कॉलरबोन्स तुटली पाहिजे आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टलाही इजा झाली पाहिजे. बलात्काराच्या आरोपींना असह्य वेदना होईपर्यंत जिवंत ठेवा आणि शेवटी त्यांना फाशी द्या. मात्र, काही वेळाने त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली ही स्टोरी काढून टाकली. पण त्याचा स्क्रीनशॉट त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. दरम्यान, या दोघांपूर्वी सौरव गांगुली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर या भारतीय क्रिकेटपटूंनी सुद्धा कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला होता.