बेन स्टोक्स CSK चा कर्णधार होणार? CEO नी दिले मोठं अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकला चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींना खरेदी केले. स्टोकच्या समावेशामुळे चेन्नईचा संघ पूर्णपणे संतुलित झाला आहे. त्याच्या रूपाने चेन्नईला उत्कृष्ट अष्टपैलू, चांगला फलंदाज आणि तगडा क्षेत्ररक्षक मिळाला आहे. त्यातच आता पुढील सत्रात एमएस धोनीच्या जागी बेन स्टोक्स संघाची कमान सांभाळू शकतो, अशी बातमीही जोर धरू लागली आहे. त्यावर चेन्नईचे CEO काशी विश्वनाथ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

क्रिकबझशी बोलताना काशी विश्वनाथ म्हणाले, आमच्या संघात बेन स्टोक्स आल्याने आम्ही उत्साहित आहोत. आम्हाला एक अष्टपैलू खेळाडू हवा होता. आम्ही भाग्यवान आहोत कि अखेरीस तो आमच्या संघात आला. एमएस धोनीला सुद्धा स्टोक्स संघात आल्याने जास्त आनंद झाला. कर्णधारपदाचा पर्याय आहे परंतु याबाबत महेंद्रसिंग धोनीला निर्णय घ्यावा लागेल. अंतिम निर्णय धोनीचं घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता आयपीएल सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा धोनीवर असतील.

दरम्यान, IPL 2022 मध्ये, धोनीने CSK चे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवले होते. मात्र जडेजाला हे आव्हान पेलवलं नाही आता त्यानंतर पुन्हा त्याने संघाची धुरा धोनीकडे सोपवली. त्यामुळे आता या वर्षी तरी धोनी चेन्नईचे नेतृत्व करतो कि अन्य कोणाकडे सोपवते हे पाहावं लागेल.