डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणजे नेमक काय? भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे असा ट्रॅक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे (Indian Railways) ही भारतीयांसाठी प्रवासाचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. स्वस्तात मस्त आणि आरामदायी प्रवास असल्याने अनेक प्रवाशी रेल्वेला आपली पसंती देतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी असते. तसेच रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे ट्रॅक असतात. अनेक ट्रॅक एकमेकांना जोडतात, अनेक एकमेकांना क्रोस करतात. हे सर्व ट्रॅक ट्रेनच्या मार्गानुसार सेट केले जातात आणि त्यातूनच ट्रेन आपला मार्ग तयार करते. यातीलच एक ट्रॅक म्हणजे डायमंड रेल्वे क्रॉसिंग. आता ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग (Diamond Railway Crossing) म्हणजे नेमक काय? आणि ते नेमकं कुठे आहे ते जाणून घेऊयात.

डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणजे नेमक काय?

रेल्वेचे अनेक ट्रॅक असतात. त्यातील एक अनोखा ट्रॅक म्हणून ओळखला जाणार ट्रॅक म्हणजे डायमंड रेल्वे क्रॉसिंग. डायमंड रेल्वे क्रॉसिंग म्हणजे जिथे रेल्वेला दिशा देण्यासाठी एक चौकोनी बॉक्स केला जातो. ज्यामुळे रेल्वेला ज्या दिशेला जायचं आहे. त्या दिशेला ती जाऊ शकेल. यामध्ये एकूण चार ट्रॅक असतात. यामध्ये ही डायमंड रेल्वे क्रॉसिंग अशी असते जशी चौकात वाहणांची क्रॉसिंग होते. अगदी तश्याच प्रमाणे रेल्वेची क्रॉसिंग होते. त्यामुळे यास डायमंड रेल्वे क्रॉसिंग असे म्हणतात. डायमंड ट्रॅकवर तुम्ही प्रत्येक दिशेने गाड्या जाताना पाहू शकता. एकदा तुम्ही ते जवळून पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावून जाल कारण अशा परिस्थितीत अपघाताचा धोकाही खूप जास्त असतो

भारतात केवळ नागपूर मध्ये आहे डायमंड रेल्वे क्रॉसिंग

डायमंड रेल्वे क्रॉसिंग ही क्वचितच ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे भारतातील केवळ नागपूर येथे आहे. परंतु हे खरोखरच डायमंड क्रॉसिंग आहे का? यावर सुद्धा अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे नागपूरला असलेले हे डायमंड रेल्वे क्रॉसिंग ही खऱ्या डायमंड रेल्वे क्रॉसिंग मध्ये गणली जात नाही. कारण डायमंड रेल्वे क्रॉसिंगसाठी एकूण चार ट्रॅक असतात आणि नागपूर येथे एकूण तीन ट्रॅक आहेत. त्यामुळे त्याचा समावेश यामध्ये होत नाही असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.