PFI ने मोदींवर हल्ला करण्याचा कट रचला होता? ED चा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या देशभरातील विविध ठिकाणांवरील छापेमारी नंतर 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. याच दरम्यान, ईडीने मोठी धक्कादायक धक्कादायक माहिती दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा कट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने रचला होता. 12 जुलै रोजी मोदींच्या पाटण्यातील रॅलीत स्फोटाची तयारी करण्यात आली होती असे ईडीने म्हंटल आहे. ईडीच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुरुवारी केरळमधून अटक करण्यात आलेल्या PFI मेम्बर शफिक पायथच्या विरोधात ईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये असा खळबळजनक दावा केला आहे की, या वर्षी 12 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा दौऱ्यादरम्यान PFIने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या निवडणूक रॅलीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित जिहादी दहशतवाद्यांनी रॅलीमध्ये स्फोट घडवून आणला होता.

दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडीने गुरुवारी पीएफआय विरोधात राबविलेल्या सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये 100 हून अधिक लोकांना अटक केली आहे. एकूण 15 राज्यांमधील 93 ठिकाणी पीएफआय ऑफिस आणि त्यांच्या नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत स्थानिक पोलिसांचाही सहभाग होता. देशभरात दंगली आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी PFI ने गेल्या काही वर्षात 120 कोटी रुपये उभे केले . या निधीतील बहुतांश रक्कम रोख स्वरूपात आहे. ईडीकडे याची संपूर्ण माहिती आहे.