कॅन्सरशी संबंधित ‘या’ आठ लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास बेतू शकते जीवावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या भारतात कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. कॅन्सर हा आजार जास्त पसरण्याआधीच त्याचे निदान होऊ शकते. मात्र जर कॅन्सरकडे लक्ष दिले नाही आणि तो जर वाढत गेला तर या आजारामुळे रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. कॅन्सर आजारात अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारांची अनेक वेगवेगळी लक्षणे आहेत. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कॅन्सर रोगाची आठ प्रमुख लक्षणे सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला त्वरीत सावध होता येईल. तसेच त्यावर उपचार घेता येतील.

1) अचानक वजन कमी होणे – पोट, फुफुस, स्वादुपिंड अशा कॅन्सर आजाराचे सर्वात पहिले लक्षात असते ते म्हणजे झटक्यात वजन घटण्यास सुरुवात होणे. ज्या व्यक्तीच्या शरीरात कॅन्सर आजाराची निर्मिती होते त्या व्यक्तीचे वजन अचानक पाच किलो किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात घसरते. त्यामुळे अशावेळी व्यक्तींनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

2) ताप येणे – वारंवार ताप येण्यास सुरुवात होणे हे देखील त्यांचं आजाराशी संबंधित आहे. वारंवार ताप हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमा सारख्या कॅन्सर आजाराचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. अनेकवेळा अचानकपणे या तापाची पातळी देखील वाढते. ताप येणे जरी व्हायरल इन्फेक्शनचे लक्षण असले तरी देखील वारंवार ताप आल्यास रुग्णालयात जावे.

3) थकवा येणे – सतत थकवा येणे हे देखील कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे. कॅन्सर रुग्णांना आपला आहार किती पौष्टिक ठेवला किंवा किती काळजी घेतली तरी त्याला शरीराच्या आतून थकवा जाणवतो. सतत झोपून राहणे आळस येणे थकवा जाणवणे अशी सुरुवातीची लक्षणे कॅन्सरच्या रुग्णात दिसून येतात.

4) त्वचेतील बदल – त्वचा गडद होणं, त्वचा आणि डोळे पिवळे होणं, त्वचेचा लालसरपणा, खाज सुटणे, केसांची जास्त वाढ अशी लक्षणे देखील कॅन्सरच्या रुग्णात दिसून येतात. सुरुवातीला आपल्या शरीरात होणारे बदल रुग्णाच्या लक्षात येत नाही. परंतु ही लक्षणे देखील कॅन्सर आजाराशी संबंधित आहेत.

5) लघवीत होणारे बदल – कॅन्सर रुग्णात सुरुवातीला त्याच्या लघवीत बदल जाणवतात. लघवीचा वास येणे, लघवीतून रक्त पडणे, लघवीचा रंग बदलणे ही सर्व लक्षणे कॅन्सर रुग्णात दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणे जरी एखाद्या व्यक्तीत दिसून आली किंवा जाणवली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण ही लक्षणे कोलन कॅन्सरशी संबंधित असू शकतात.

6) बऱ्या न होणाऱ्या जखमा – शरीरावरील तीळ वाढणं झालेल्या जखमाच बऱ्या न होणे ही लक्षणे कॅन्सरशी संबंधित असू शकतात. तसेच जर घसा दुखत असेल किंवा त्यात वेदना होत असतील परंतु डॉक्टरांचा सल्ला घेऊन देखील आराम मिळत नसेल तर अशी लक्षणे देखील तोंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतात. अशावेळी एका दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

7) सतत खोकला/ खवखव – सतत घशात खवखव होणे खोकला न थांबणे ही लक्षणे फुफ्फुसाच्या कॅन्सरशी संबंधित असू शकतात. त्यामुळे तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला वाढत चालला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

8) गिळण्यास अडचण – सतत अपचन होणे घास गळताना त्रास होणे घसा खवखवणे किंवा तो सतत दुखणे अशी लक्षणे घशाशी संबंधित कर्करोगाची असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.