व्हिस्की, वाईन, वोडका, बिअर, रम मधील फरक तुम्हांला माहितेय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात प्रत्येक ठिकाणी मद्य प्यायले जाते. ज्याप्रमाणे खाद्य पदार्थाचे विविध प्रकार असतात तसेच मद्याचे देखील विविध प्रकार असतात. जसं की वाईन, व्हिस्की, रम, वोडका, बिअर. जे लोक मद्य पितात त्यांना यातला फरक माहिती असतो परंतु ते कशापासून बनले आहे हे त्यांना माहिती नसते आणि जे लोक दारू पितच नाहीत त्यांना यातले काहीच माहित नसते. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या प्रकारात नेमका फरक काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात दारू -दारू मधील फरक.

1)  व्हिस्की : Whisky 

प्रत्येक दारूत अल्कोहोलचे प्रमाण असते. काहीमध्ये अधिक तर काहीमध्ये कमी प्रमाण असते. मात्र नशा ही चढतेच. परंतु दारू बनवण्याच्या पद्धतीत आणि पदार्थात हा फरक हमखास दिसून येतो. तसेच व्हिस्की हे बाहेरील देशात अधिक पिली जाते. व्हिस्की ही गहू आणि बार्लीसारख्या धान्याचे मिश्रण केले जाते कारण या दोन्ही धान्यात एकूण 30 ते 65 टक्के अल्कोहोल असते. म्हणनून त्याचा उपयोग केले जातो. परंतु जरी यात एवढे अल्कोहोल असले तरी व्हिस्की मध्ये 40 टक्के अल्कोहोलचा समावेश असतो. याचा दर्जा देखील तितकाच मोठा आहे.

2) वोडका : Vodka

वोडका हा सर्वात महाग आणि सर्वाधिक अल्कोहोल असलेले मद्य आहे. रशिया आणि युरोपसारख्या ठिकाणी याचे प्रमाण अधिक आहे. वोडकामध्ये एकूण अल्कोहोल 60 टक्के एवढे असते. त्यामुळे त्यामध्ये नशेचे प्रमाणही अधिक आहे. वोडका हा पाण्यासारखा दिसतो. वोडका धान्य आणि ऊसाच्या माळीपासून बनवला जातो. तसेच वोडका हा साखर, कॉर्न, आणि ज्वारी यापासूनही वोडकाची निर्मिती केली जाते.

3) वाईन : Wine

वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण हे 9 ते 18 टक्के असते. त्यामुळे याची नशाही सौम्य असते. वाईन ही द्राक्षपासून बनवली जाते. ती विविध प्रकारातही भेटते म्हणजे जसे की, लाल, पांढरी. लाल वाईन ही काळ्या व लाल द्राक्ष्यापासून बनवली जाते. तर व्हाइट वाईन ही द्राक्ष्यांना आंबून त्याच्या रसापासून बनवली जाते.  यांमध्ये द्राक्ष्याचे किण्वन करताना द्राक्षाच्या रसातील साखरेचे अल्कोहोलमध्ये रूपांतर होते.  वाइनमधील अल्कोहोल (इथेनॉल) मेंदूतील विविध मज्जातंतूत मार्ग अवरोधित करते.  वाईन जरी दारू असली तरी देखील त्याचा हृदयाला फायदा होतो. कारण वाइनमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे हृदय आणि रक्त परिसंचरणांना फायदा होऊ शकतो.

4) रम : Rum

रम ही सर्वाधिक हिवाळ्यात प्यायली जाते. यात अल्कोहोलचे प्रमाण अधिक असले तरी त्याची किंमत त्यामानाने अत्यंत कमी आहे. रम ही ऊसाच्या रसापासून बनवली जाते. ऊसाच्या रसाला आंबवले जाते आणि त्यात जळलेली साखर, गूळ आणि कॅरेमल हे चव आणि रंगासाठी वापरले जाते. रमचे देखील विविध प्रकार पडतात. जसं की पांढरा रम , गोल्ड रम, गडद रम, मसालेदार रम, अतिप्रूफ रम,  अॅग्रिकल्चरल रम,  नेव्ही रम अश्या विविध प्रकार आणि फ्लेवर मध्ये हे मद्य मिळत असल्यामुळे त्याची मागणीही तेवढी अधिक आहे.

5) बिअर : Bear

बिअरमध्ये अत्यंत कमी प्रमाणात अल्कोहोल असते. मात्र त्याचे अधिक सेवन केल्यास त्याची नशा ही चढू शकते. बिअर ही जव, तांदूळ आणि मका या तिन्हीच्या मिश्रणनाने बनवली जाते. यात केवळ 10 टक्के अल्कोहोल असते. बिअरमध्ये देखील विविध फ्लेवर मिळतात. त्यामुळे पार्टी, सेलेब्रेशन या सारख्या कार्यक्रमात बिअर अधिक प्यायली जाते.