दुपारी आणि संध्याकाळी EV चार्जिंग करण्यासाठी वेगवेगळे दर ! ऊर्जा मंत्रालयाचा नवीन ड्राफ्ट, त्याविषयीची माहिती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपल्याकडेही जर इलेक्ट्रिक वाहन असेल किंवा आपण ते विकत घेण्याचा विचार करीत असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. कारण आतापर्यंत जिथे इलेक्ट्रिक वाहन चार्ज (Charge) करण्यासाठी एकच किंमत लागली जात होती, आता आपल्याला त्यासाठी सकाळ आणि दुपारी बदल दिसू शकतात. म्हणजेच, सकाळी आपल्याकडून आपल्या गाडीच्या चार्जिंगसाठी कमी पैसे आकारले जाऊ शकता आणि संध्याकाळी आपल्याला त्याच चार्जिंगसाठी सकाळ किंवा दुपारपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. म्हणजेच, आता चार्जिंगसाठी आपल्याला विजेसाठी वेगवेगळी किंमत मोजावी लागेल. पब्लिक चार्जिंग स्टेशन (Public charging station) आणि खासगी चार्जिंग स्टेशनवरही (privatecharging station) विजेचे दर बदलू शकतात.

वीज मंत्रालयाने (Ministry of energy) शुल्कवाढीसंदर्भातील या नव्या ड्राफ्टमध्ये केलेल्या तरतुदीनुसार तुम्हाला EV चार्जिंगवर वेगवेगळे शुल्क द्यावे लागतील. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी वेगवेगळे वीज दर लागू होतील. या तरतुदीनुसार पीक अवरमध्ये चार्जिंगवर जादा दर भरावा लागतो. नॉन पीक अवरमध्ये शुल्क आकारणे सर्वात कमी असू शकेल.

मागणी-पुरवठ्यानुसार नियामक दर निश्चित केले जातील
उर्जा मंत्रालयाच्या या नव्या ड्राफ्टमध्ये टाइम ऑफ द डे टॅरिफ (Time of the day tariff ) ची तरतूद आहे. सार्वजनिक आणि खासगी चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र दर आहेत. यामध्येही अशी तरतूद आहे की, नियामक मागणी-पुरवठ्यानुसार दर ठरवेल. एग्रीगेटर ओपन मार्केटमधून रिन्यूएबल एनर्जी खरेदी करू शकतील. मंत्रालयाने या प्रस्तावावरील सर्व भागधारकांचे मत जाणून घेतले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवरही सरकारचे लक्ष आहे
महत्त्वाचे म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्राचे जगभरात वेगाने इलेक्ट्रीकरण होत आहे. पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी हे योग्य पाऊल आहे. त्याचबरोबर भारतही या दिशेने वेगाने काम करत आहे. यासाठी विद्यमान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेक वेळा सांगितले आहे. प्रदूषण रोखण्याच्या प्रयत्नात सरकार इलेक्ट्रिक वाहनावर लक्ष केंद्रित करीत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment