देशात तयार होतोय डिजिटल महामार्ग, 10000 KM चा प्रकल्प, हायवेतून मिळणार इंटरनेटचा आनंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश गेल्या काही वर्षांपासून डिजिटल होत आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झाल्याने आपले जीवनमान सुद्धा सोप्प झालं आहे. डिजिटल क्रांतीमुळे संपूर्ण जगात देशाचा दबदबा आहे. एकीकडे डिजिटलाझेशन सुरु असताना दुसरीकडे देशातील रस्ते सुद्धा गेल्या काही वर्षांपासून अगदी चकाचक झाले आहेत तर अनेक ठिकाणी नवनवीन रस्त्यांचे काम अजूनही सुरू आहे. त्यातच आता आणखी एक बातमी समोर येत आहे. आता चक्क हायवेतून इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इंटरनेट ह्या विश्वातील महत्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी इंटरनेट असावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मग तो दुर्गम भाग असो वा महामार्ग. आता हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चक्क हायवेतून इंटरनेटची (Digital Highway) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता हा महामार्ग कसा असेल, त्याचे फायदे काय असतील हे जाणून घेऊयात.

कसा असेल हा महामार्ग?

इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 10 हजार किलोमीटरचा रस्ता वापरला जाणार आहे. त्यासाठी ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला जाणार आहे. ऑप्टिकल फायबरमध्ये असलेल्या लहान तारांमुळे इंटरनेटची सुविधा ही जलद गतीने होते. हा प्रकल्प नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडद्वारे बांधला जाणार आहे. NHAI ने 2025 पर्यंत तब्बल 10,000 किलोमीटर लांबीचा महामार्ग बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामध्ये ऑप्टिकल फायवबर केबल कनेकशन टाकले जाणार आहे. आणी त्याद्वारे इंटरनेट सुविधा दिली जाईल.

कुठे बांधला जाईल हा महामार्ग?

हा प्रकल्प हैदराबाद- बंगळुरू कॉरिडॉरवरील 512 किलोमीटर आणि दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील 1367 किलोमीटरपर्यंत ह्याची पोहोच असणार आहे. या हायवे इंटरनेट प्रकल्पामुळे महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक  ह्यासारख्या राज्यात हाय-स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे. हा प्रकल्प हाती घेऊन NHAI ने सर्वांना सुरक्षित, शाश्वत वाहतूक पुरवण्याचे काम हाती घेतले आहे. ह्या सेमी हाय स्पीड नेटवर्कचा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.