दिग्विजय सिंह यांच्या ‘त्या’ विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजप – काँग्रेसमध्ये नवा राजकीय कलगीतुरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेचे कलम 370 हटवलं. मात्र त्यावेळेला कलम 370 बाबत केलेलं दिग्विजय सिंह यांचं विधान आता जोरदार चर्चेत आले आहे. ‘क्लबहाऊस’ या ॲप मधील लाईव्ह चर्चेदरम्यान एका पाकिस्तानी पत्रकाराशी बोलताना दिग्विजयसिंह यांनी 370कलम बाबत विधान केलं होतं. त्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजपच्या अनेक नेत्यांनी दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यावरून टीका करायला सुरुवात केली आहे. या सोबतच राहुल गांधी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावे असे देखील म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी क्लबहाऊस या ॲप्लिकेशनवर एका चर्चमध्ये सहभाग घेतला होता. या चर्चे मधील एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये शाहजेब गिलानी नावाच्या जर्मनी मध्ये राहणाऱ्या एका पाकिस्तानी पत्रकारांसोबत ते चर्चा करत होते. यावेळी कलम 370 चा मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना “काँग्रेस सत्तेत आल्यास 370 हटवण्याचा निर्णय याचा नक्कीच पुनर्विचार करू” असं विधान दिग्विजय सिंह यांनी केलं होतं. भाजपचे कर्नाटक मध्ये आमदार गिरिराज सिंह यांनी ‘क्लब हाऊस’ मधील ही ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. तसेच यासोबत काँग्रेसचे पहिलं प्रेम पाकिस्तान आहे. दिग्विजयसिंह यांनी राहुल गांधींचा संदेश पाकिस्तानला दिला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानला मदत करेल. अशा शब्दात गिरिराज सिंह यांनी टीका केली आहे.

ऑडिओ क्लिप बाबत स्पष्टीकरण द्या

याबरोबरच भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी देखील टीका केली आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी, दिग्विजय सिंह यांच्या क्लबहाऊस बद्दल काय मत आहे? हीच भूमिका काँग्रेसची आहे ? आम्ही मागणी करतो की राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण द्यावं” असं संबित पात्रा यांनी म्हटले आहे. त्या पाठोपाठ भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर करून काँग्रेस वर सध्या ते निशाणा साधत आहेत

दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने टिकेला सुरुवात केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांना खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. “अनपढ़ लोगों की जमात को Shall और Consider में फ़र्क़ शायद समझ में नहीं आता ” असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले त्यामुळे आता मुद्द्यावरून टूलकिट प्रमाणे नवा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Leave a Comment